नवी दिल्ली : प्रतिनिधी
‘मेक इन इंडिया’ आता ‘बाय फ्रॉम चायना’ झाल्याचा दावा करत सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर आपला हल्ला तीव्र केला. चीनविषयाचे धोरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल शुक्रवारी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधारी भाजपचे वर्णन “बीजिंग जनता पार्टी” असे केले आहे.
बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील भाषणादरम्यान सरकारवर आपला हल्लाबोल करत राहुल गांधी म्हणाले होते की मोदी सरकारने असंघटित क्षेत्र आणि रोजगार निर्माण करणारे एमएसएमई नष्ट केले आहेत.
“भारतासाठी जुमला, तर चीनसाठी नोकऱ्या! मोदी सरकारने असंघटित क्षेत्र आणि MSMEs नष्ट केले आहेत ज्यामध्येच सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होतात. परिणामी ‘मेक इन इंडिया’ आता ‘चीनकडून खरेदी’ असा उपक्रम आहे,” राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ शेअर करत एक ट्विट केलं असून ज्यामध्ये त्यांच्या लोकसभेतील भाषणाचे दाखले आहेत.