मॅक्सीकॅब चालक-मालक संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारने मॅक्सीकॅबचा कर वाढविल्यामुळे व्यवसाय करणे अशक्मय झाले आहे. 900 रुपयांचा कर 700 रुपये करण्यात आला. मात्र ज्या नवीन अटी घालण्यात आल्या आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत. 3050 एलएमव्ही पर्यंतच्याच वाहनांना हा कर लागु करण्यात आला आहे. मात्र आमच्याकडे 3100 एलएमव्ही मॅक्सीकॅब आहेत. त्यांना 1650 रुपये एका व्यक्तीसाठी कर भरावा लागत आहे. यामुळे व्यवसाय करणेच कठीण झाले आहे. तेंव्हा जो कर जाहीर केला आहे तो 3100 एलएमव्हीला लागू करावा, अशी मागणी उत्तर कर्नाटक मॅक्सीकॅब मालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सी. एच. राचन्नावर, हनुमंत चलवादी, एच. एम. तोपीनकट्टी, मारुती हालहरवी यांच्यासह इतर मॅक्सीकॅब चालक व मालक उपस्थित होते.
कर नियम दुरुस्तीत मोठी तफावत
कोरोनामुळे एक तर व्यवसाय नाही. त्यातच लागू करण्यात आलेला करदेखील अधिक आहे. त्यामुळे आम्हाला जीवन जगणे कठीण झाले आहे. आम्ही यापूर्वी निवेदन दिल्यानंतर दुरुस्ती केल्याचे दाखविण्यात आले. मात्र दाखविताना नियमामध्ये मोठी तफावत दाखविण्यात आली आहे. त्यामुळे आम्हाला व्यवसाय करणे अशक्मय आहे. तेंव्हा कर तातडीने कमी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.









