वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
मूळचे भारतीय असणारे राज सुब्रमण्यम हे अमेरिकन कुरिअर सेवा देणारी कंपनी ‘फेडेक्स’चे आगामी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनणार असून या संदर्भात कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे. ते कंपनीचे अध्यक्ष व सध्याचे सीईओ प्रेडरिक डब्ल्यू स्मिथ यांची जागा घेणार आहेत. नव्या नियुक्तीसोबत सुब्रमण्यम हे येत्या 1 जून रोजी कामावर रुजू होणार असल्याचे संकेत आहेत.
स्मिथ यांनी सुब्रमण्यम यांची घोषणा करत फेडेक्सला नव्या उंचीवर पोहोचविणार असल्याचा दावाही केला आहे. स्मिथ यांनी वर्ष 1971 मध्ये फेडेक्सची स्थापना केली होती. जगभरात कंपनीचे जवळपास 6 लाखांपेक्षा अधिकचे कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती आहे.
नवी जबाबदारी नव्या उंचीवर नेणार
स्मिथ यांनी ज्या जोरावर मोठय़ा कष्टाने जगभरात प्रतिष्ठेसोबत कंपनीची सुरुवात केली आहे. हिच जबाबदारी आता मी पुढे नेटाने प्रयत्न करून निभावणार असल्याचा विश्वास नव नियुक्त सीईओ सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे.









