वृत्तसंस्था/ सिडनी
कोरोनामुळे क्रिकेटचे सामने, सराव व प्रशिक्षण सारे काही ठप्प झाल्यामुळे क्रिकेटपटू सोशल माध्यमांवर सक्रिय झाले आहेत आणि यातून मोठे मनोरंजनही होत आहे. गत आठवडय़ात असाच एक प्रकार भारतीय क्रिकेटपटू मुरली विजयच्या इन्स्टाग्राम चॅटमुळे घडून आला आहे. मुरलीने इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटवर डिनर डेटवर जाण्यासाठी आवडती व्यक्ती म्हणून ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिस पेरी आणि टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवन यांच्या सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुरलीच्या या प्रस्तावाला पेरीने होकार देताना एक मजेशीर अट ठेवली आहे. रविवारी एका सोनी स्पोर्ट्स वाहिनीच्या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान तिने संवाद साधला. या मुलाखतीदरम्यान तिला मुरलीच्या डेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने मजेशीर उत्तर देताना मुरली जर डिनर डेटचे बिल भरत असेल तर मी नक्की जाईन. तो खूप चांगला व्यक्ती आहे, असे उत्तर तिने दिले.









