नवी दिल्ली
स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) मुदतठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने सर्व मुदतींच्या ठेवींवरील व्याजदरात 0.40 टक्क्यांची कपात केली आहे. नवे दर 27 मेपासून लागू झाले आहेत. एसबीआयने 2 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या मुदतठेवींवरही 50 बीपीएसपर्यंतची कपात केली आहे. या श्रेणीत बँक कमाल 3 टक्क्यांचे व्याज देत आहे. यापूर्वीही एसबीआयने चालू महिन्यात मुदतठेवींवरील व्याजदर कमी केला होता.
एसबीआयने 12 मे रोजी मुदतठेवींवर मिळणाऱया व्याजात 0.20 टक्क्यांची कपात केली होती. त्यानंतर एसबीआयने बचत खात्यावर मिळणारे व्याजही घटविले हेते. बचत खात्यात जमा रकमेवर आता 2.75 टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे, यापूर्वी हा व्याजदर 3 टक्के होता.









