बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचे सरकार कन्नडिगांना खाजगी क्षेत्रात अधिक नोकऱ्या मिळवून देण्यासाठी “मोठ्या प्रमाणावर” प्रयत्न करेल,यासाठी कर्नाटक सरकारने एका विशेष कार्यक्रमाची आखणी केली आहे. असोसिएशन ऑफ कन्नड कूटस ऑफ अमेरिका (AKKA) या अनिवासी कन्नडिगांच्या ना-नफा समूहाने आयोजित केलेल्या कन्नड राज्योत्सव सोहळ्याला बोम्माई संबोधित करत होते. “आम्ही मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये कन्नड भाषा सक्तीची केली आहे. अनेक प्रयत्न करूनही यात यश आलेले नाही. म्हणून, एक विशेष कार्यक्रम तयार केला पाहिजे,” असे बोम्माई म्हणाले.
“कन्नड भाषीकांना विविध श्रेणींमध्ये सर्वाधिक नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत हे कायद्यातही आहे. आणि आम्ही या कायद्याची अंमलबजावणी करू.” बोम्माई म्हणाले की सरकारने कायदेशीर बाबी दाखवून स्थानिकांसाठी नोकऱ्या राखून ठेवण्यासाठीचा कायदा अगोदरच्या सरहकारने न केल्याने, त्यांनी कर्नाटक औद्योगिक (स्थायी आदेश) नियम, 1961 मध्ये सुधारणा केली आहे, ज्यामुळे औद्योगिक युनिट्स कन्नड भाषीकांना गट C आणि D नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देऊ शकतात. शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या महत्त्वावर भर देताना बोम्माई म्हणाले की सरकार कन्नडमध्ये उच्च शिक्षण देईल. “यामध्ये अनेक आव्हाने आहेत आणि आमचे सरकार त्यांना तोंड देण्यासाठी तयार आहे,”