वार्ताहर /हरमल
मांदे मतदारसंघात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या झंझावाती दौरा कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.मात्र ऐनवेळी राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या भेटीस गेले व निरनिराळे तर्कवितर्क दोन्ही बैठकीतील कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण केला.मात्र मुख्यमंत्र्यांनी चतुराईने प्रश्न हाताळल्याने दोन्ही बैठकीतील कार्यकर्त्यांनी निश्वास सोडला.
काल राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत मांदे मतदारसंघाच्या दौऱयावर होते.मोरजी, केरी,पालये व हरमल भागांत बैठका व उदघाटने झाली.हरमल भागांत जेवणाचा कार्यक्रम होता व नंतर नागरिकांच्या समस्या व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते.मात्र माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी अनौपचारिक बैठक घेतली.माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आजच्या मोरजी,चोपडेतील तसेच हरमलच्या उदघाटनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले.मांदे मतदारसंघात व पर्यायाने पेडणे तालुक्मयाच्या विकासासाठी तुये इलेक्ट्रॉनिक सिटी,तुये इस्पितळ, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ,वीज उपकेंद्र, सुके कुळण येथील पंपिंग स्टेशन आदीबाबत चिंता व्यक्त केली.तुये इस्पितळात 51 कोटी रुपये जनतेचे घातले व सध्या त्यांचे काम जवळजवळ बंद आहे,त्याचा पाठपुरावा करण्यात अपयश आले.इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी 6 लाख चौ मीटर जागा मूळ मालकांना दुखावून जागा घेतली,युवकांना रोजगार संधी मिळावी म्हणून घेतली.गेल्या साडे चार वर्षात आवश्यक गती मिळाली नसल्याचे दुःख आहे.
राज्याची धुरा सांभाळताना मुख्यमंत्र्यांनी आपणास व जुन्या कार्यकर्त्यांना भेटण्याची इसचा प्रदर्शित केली ह्याचा अभिमान वाटला.संघटनेचे काम मुख्यमंत्र्यांनी सांभाळले ह्यात त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते.अगदी कमी वेळेत कार्यकर्ते जमा झाले ह्यावरून भाजप पक्षाविषयी आत्मीयता दिसून येते.यावेळी प्रमुख कार्यकर्ते जगन्नाथ पार्सेकर, संतोष शेटगावकर, गोविंद पार्सेकर, सुधीर नाईक आदींनी मांदेचे नेतृत्व करण्याची संधी पार्सेकरांना द्यावी असा विचार मांडला.गेली 25- 30 वर्षे मांदे मतदारसंघात भाजपचे कार्य केले. त्या निस्सीम व नि÷ावंत कार्यकर्त्यांना संघटनेच्या कार्यातून मुक्त करण्याचे कारण काय असा सवाल जे÷ कार्यकर्ते व माजी जीप सदस्य अरुण बांधकर यांनी व्यक्त केला.ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणारे सध्याचे कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्यावर भाष्य करतात,त्यांची तेवढी लायकी आहे का,असे मत बांधकर यांनी व्यक्त केले.दिवे लावले म्हणजे विकास नव्हे,एक व्हिजन पाहिजे व मांदेतील मतदारांना पार्सेकर सर नेता म्हणून पाहिजे असे बांधकर यांनी व्यक्त केले.यावेळी कार्यकर्त्याच्या मतांचा आपणास अवश्य आदर असून ह्याचा आपण राज्यातील संघटना, केंद्रीय समितीच्या कानी आपण निश्चित घालणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले.गोव्याच्या विकासात पार्सेकरांचे योगदान खूपच मोठे असून त्यांच्या कार्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. तुमचा भाजपविषयी प्रेम व जोश असाच असुदे असे मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अरुण बांधकर यांनी मानले.









