ऑनलाईन टीम / अलिबाग :
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज अलिबागमधल्या कोर्लई गावाला भेट दिली. गावात पोहचल्यानंतर तिथे भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आल्याने हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. पण कोर्लई ग्रामपंचायतीतआमची व्यवस्थित भेट झाली. आम्ही तिथे बंगल्यांची सर्व कागदपत्रे दिली. दोन दिवसांत ते या बंगल्यांबाबतची सद्यपरिस्थिती कळवणार आहेत, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.
सोमय्या म्हणाले, कोर्लई ग्रामपंचायत कार्यालायात आमची व्यवस्थित चर्चा आणि ग्रामसेवकांशी भेट झाली. पुण्यासारखा प्रकार इथे झाला नाही. पुण्यात उद्धव ठाकरेंनी गुंडांना लाठ्याकाठ्या घेऊन पाठवलं होतं. इथे स्वाभाविक आहे सत्तेसाठी सत्तेपोटी तो सरपंच सकाळी म्हणतो बंगले आहेत आणि दुपारी सांगतो बंगले गायब झाले.
मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणतात बंगले नाहीत तर मिसेस मुख्यमंत्री म्हणतात माझे बंगते आहेत. मुख्यमंत्री खरे आहेत की मिसेस मुख्यमंत्री खऱ्या आहेत याची स्पष्टता ग्रामपंचायत करू शकली नाही. त्यामुळे मला रेवदंडा पोलीस ठाण्यात या 19 बंगल्यांच्या तपासाबद्दल अर्ज द्यावा लागला.