रिलायन्स न्यू एनर्जी नवी योजना विकसित करणार
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ची पूर्ण मालकी असणारी रिलायन्स न्यू एनर्जी (ऊर्जा) सोलर लिमिटेड अमेरिकन कंपनी अंबरी इंक यांच्यामध्ये 14 कोटी 40 लाख डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेच्या मॅसाचुसेट्समधील अंबरीच्या 4 कोटी 23 लाख समभागांची रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड 5 कोटी डॉलर्समध्ये खरेदी करणार आहे.
रिलायन्स न्यू एनर्जीने आपल्या योजनेनुसार गुंतवणूकदार पॉलसन ऍण्ड कंपनी इंक ऍण्ड बिल गेट्स आणि काही अन्य गुंतवणूकदारांसोबत हा व्यवहार करणार असल्याची घोषणा केली आहे. गुंतवणुकीमधून कंपनीला जागतिक पातळीवर आपल्या लांब पल्ल्याच्या एनर्जी सिस्टमला विकसित करण्यास मदत मिळणार आहे. अंबरी इंक जवळ 4 ते 24 तासांपर्यंत काम करणाऱया एनर्जी स्टोरेज सिस्टम्सचे पेटंट आहे.
भारतात बॅटरीची निर्मिती ?
रिलायन्सचे प्रमुख मुपेश अंबानी यांनी, नवीन कंपनी आणि अंबरी भारतामध्ये मोठय़ा प्रमाणात बॅटरीची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये रिलायन्सच्या ग्रीन ऊर्जा इनीशियेटिव्हचे काम करण्यास मदत मिळणार असल्याची माहिती आहे.









