वृत्तसंस्था/ मुंबई
इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेतील माजी विजेत्या मुंबई सिटी एफसी संघाने अलीकडेच नॉर्थईस्ट युनायटेड संघातील फुटबॉलपटू लालेंगमेवाई याच्याशी नवा करार केला आहे.
आगामी इंडियन सुपरलिग हंगामात लालेंगमेवाई मुंबई सिटी एफसी संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. लालेंगमेवाईबरोबर मुंबई सिटी एफसी संघाने पाच वर्षांसाठी हा करार केल्याचे सांगण्यात आले. मिझोरामच्या लालेंगमेवाईने 2017 साली झालेल्या फिफाच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.









