मुंबई/प्रतिनिधी
अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) शनिवारी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रातील क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर (rave party) छापेमारी केली. यावेळी 22 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये एका बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाचाही समावेश असल्याची चर्चा आहे. एनसीबी पथकाचे नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी पुन्हा एकदा ही दमदार कामगिरी केली आहे. यावेळी एनसीबी ने ३० ग्रॅम चरस, २० ग्रॅम कोकेन, २० ग्रॅम टॅबलेट्स आणि १० ग्रॅम एमडी जप्त केले आहे.
दरम्यान मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीमध्ये २२ जणांना ताब्यात घेतले आहे. हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याकडे जात होते. यामध्ये एक बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलाचा समावेश आहे अशी माहिती समोर आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्लीतील ड्रग तस्कर आहेत. प्रत्येक व्यक्तीने या पार्टीत प्रवेशासाठी ८० हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती. क्रूज पार्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. यामध्ये काही नामवंत उद्योगपतींच्या मुलींचा समावेश आहे. दरम्यान आता एनसीबी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (ShahRukh Khan Indian actor) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याची मुंबई क्रूज ड्रग (Drug) प्रकरणात चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.