वृत्तसंस्था/ जयपूर
विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे झालेल्या इलाईट ड गटातील शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई संघाने हिमाचलप्रदेशचा 200 धावांनी दणदणीत पराभव केला. मुंबई संघाने साखळी फेरीत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.
या स्पर्धेच्या साखळी फेरीतील यापूर्वी झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्ली, महाराष्ट्र, पाँडेचेरी तसेच राजस्थानचा पराभव केला. मुंबईने साखळी फेरीतील आपला सलग पाचवा विजय नोंदविला.
सोमवारी झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 50 षटकांत 9 बाद 321 धावा जमविल्या. शार्दुल ठाकूरने 92, सुर्यकुमार यादवने 91, आदित्य तरेने 83 धावा जमविल्या. हिमाचलप्रदेशतर्फे ऋषी धवनने 4 तर जैस्वालने 3 गडी बाद केले. त्यानंतर हिमाचलप्रदेशचा डाव 121 धावा आटोपला. डागरने नाबाद 38 धावा जमविल्या. मुंबईतर्फे सोळंकीने 4 तर मुलानीने 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई 50 षटकांत 9 बाद 321, हिमाचलप्रदेश सर्वबाद 121.









