निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा भाजपचा निर्णय
प्रतिनिधी /पणजी
काल शुक्रवारी सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने दोन दिवसांपूर्वी मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलेल्या मिलिंद नाईक यांना उमेदवारी द्यायची नाही, असा निर्णय घेतला आहे.
भाजप एकूण 12 ठिकाणी नवे चेहरे आणणार आहे. पेडणे, मये व सावर्डे या ठिकाणी विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली जाणार नही. चौथा आमदार हे मुरगावचे मिलिंद नाईक हे आहेत. वासनाकांड प्रकरणी त्यांचा राजीनामा घेणे मुख्यमंत्र्यांना भाग पाडले होते. आता या मंत्र्यांमुळेच सरकार अडचणीत आलेले असल्याने त्यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी नाकारली जाणार आहे. मुरगावात नव्या उमेदवाराचा शोध भाजपने सुरू केलेला आहे.









