आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट
प्रतिनिधी/मिरज
मिरज-बेळगाव गेट रेल्वेमार्गावर म्हैसाळ रोडवरील उड्डाण पुलाजवळ मिरजेतील रेल्वे ड्रायव्हर के. अनंत पद्मनाभ आचार्यलु (वय 45 सध्या रा. प्रथमेश अपार्टमेंट रेल्वे स्टेशनजवळ मिरज. मुळगाव हैदराबाद, आंध्रप्रदेश) यांनी रविवारी मध्यरात्री रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली. रेल्वे ड्रायव्हर म्हणून काम करणारे के. अनंत यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांना सदरची घटना निदर्शनास आल्याने त्यांनी मिरज शहर पोलिसांत याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.