56 लाख रुपये खर्चून 20 हजार स्क्वेअर फुटावर बांधकाम सुरू, आपत्ती निवारण कक्षासह दोन कार्यालयही असणार
प्रतिनिधी / मिरज
नगरपालिकेच्या अस्तित्वापासून आपत्ती निवारणासाठी सक्रिय असणारे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे ‘फायर स्टेशन’आता मुंबई-पुण्याप्रमाणे आत्याधुनिक होत आहे. सांगलीकर मळा, कमानवेस येथे तब्बल 20 हजार स्क्वेअर फुट जागेवर नव्या इमारतीच्या बांधकामाचा नुकताच शुभारंभ झाला.
आगामी सहा महिन्यात या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल.अग्निशमनच्या चार गाड्या उभारतील अशी पार्किंग व्यवस्था, आपत्ती निवारण कक्ष, जीव रक्षक प्रणाली यंत्रणा, आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी दोन कार्यालय असणार आहेत. यासाठी 56 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय लगतच पोलिस चौकी आणि मल्टीपर्पज हॉल उभारण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.