वृत्तसंस्था/ मियामी
ऑस्ट्रेलियाची महिला टॉप सीडेड टेनिसपटू ऍश्ले बार्टीने येथे झालेल्या मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद स्वतःकडे राखले. शनिवारी या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बार्टीने कॅनडाच्या अँड्रेस्क्यूचा पराभव केला.
कॅनडाच्या अँड्रेस्क्यूला या सामन्यातील दुसऱया सेट्समध्ये खेळताना उजव्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाल्याने तिने हा सामना अर्धवट सोडला. बार्टीने सदर सामना 6-3, 4-0 असा जिंकून जेतेपद स्वतःकडे पुन्हा राखले. 2019 साली अँड्रेस्क्यूने अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. आता पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया चार्लस्टन टेनिस स्पर्धेत बार्टी सहभागी होणार आहे.









