प्रतिनिधी/ बेळगाव
मास्तमर्डी येथे अंदर-बाहर जुगार खेळणाऱया चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 1520 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अनिल निंगाप्पा कुरंगी, नागाप्पा निंगाप्पा कुरंगी, दौलत सोमाप्पा कुरंगी, बाबु यल्लाप्पा तारिहाळकर (सर्व रा. मास्तमर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एम. पिरडी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
अटक करण्यात आलेल्या चौघा जणांवर मारिहाळ पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रविवारी मारिहाळ येथील एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून सहा जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या संबंधीचा तपशील उपलब्ध झाला नाही.









