वार्ताहर/माशेल
माशेल येथील दाडसकाळ संघातर्फे 8 ते 10 एप्रिल दरम्यान वेटरन्स क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार असून स्पर्धा विद्युत झोतात खेळविण्यात येईल. या स्पर्धेतील लक्ष्मी रवळनाथ संघाने आपल्या जर्सीचे अनावरण श्री लक्ष्मीरवळनाथ मंदिरचे पुजारी जयकृष्ण भगत यांच्याहस्ते केले.
यावेळी निलेश गावडे, सुदेश चोडणकर, गजानन माशेलकर, मोहनदास शिरोडकर व किर्तीकुमार भगत हे उपस्थित होते. संघाचे पुरस्कृर्ते संदेश भगत व शैलेश भगत हे आहेत.









