साहित्य : अर्धी वाटी खवा, 20 ते 25 काजू, 3 चमचे तेल, 2 तमालपत्र, अर्धा इंच दालचिनी तुकडा, 3 लवंग, 3 वेलची, 1 चमचा जिरं, 2 कांदे बारीक चिरून, 1 वाटी टोमॅटो प्युरी, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, चवीपुरते मीठ, पाव चमचा वेलचीपूड, अर्धा चमचा कसूरीमेथी, अर्धी वाटी दूध, 1 चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा हळदपूड, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
कृती : गरम तेलात काजू परतवून घ्यावेत. त्याच गरम तेलात जिरं टाकावे. नंतर तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि वेलची टाकावी. आता त्यात कांदा टाकून गुलाबी रंगावर परतवावा. नंतर आलं-लसूण पेस्ट टाकून मिश्रण मिक्स करावे. आता टोमॅटो प्युरी मिक्स करावी. नंतर लाल तिखट पावडर, हळदपूड, मीठ आणि हिरवी मिरची टाकून मिश्रण मंद आचेवरच परतवावे. आता मावा आणि वेलचीपूड टाकून मिश्रण दोन मिनिटे मिश्रण परतवावे. नंतर त्यात काजू आणि दूध ओतून मिश्रण दोन मिनिटे शिजवावे. मिश्रण दाट झाले की आच बंद करावी. वरून कसूरीमेथी टाकावी. आता तयार मावा काजू करी गरम भातासोबत अथवा नानसोबत खाण्यास द्या.









