मालवण/प्रतिनिधी-
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सौजन्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोका निवारण प्रकल्प टप्पा २ अंतर्गत ग्राम कृतीदल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी मालवण पंचायत समिती सभागृह येथे अर्धदिवशीय शिबीर नायब तहसीलदार जी एम कोकरे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या वतीने मिलिंद वैद्य, योगेश परदेशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आचरा, देवबाग, तारकर्ली, देवाली गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, जीवरक्षक, कृतीदल समिती सदस्य आदी उपस्थित होते. एकूणच प्रत्येक केंद्र अंतर्गत ३० जणांची टीम बनवून ती प्रशिक्षित केली जाणार आहे. आपत्ती ओढवल्यास ती टीम पुढाकार घेऊन मदतकार्य करेल. मदत बचाव, प्रथमोपचार, वहन पद्धती,अग्निशमन, निवारा व्यवस्थापन या सर्वाचा यात समावेश असणार आहे. या दृष्टीने कोणाला या टीम मध्ये सहभागी करून घ्यावे या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.
६ ते १० मार्च रोजी प्रात्यक्षिकासह तज्ञ टीम मार्गदर्शन करणार
आपत्ती निवारा केंद्र अंतर्गत प्रत्येकी ३०-३० जणांचा समूह तयार केला जाणार आहे. त्यांना आचरा व तारकर्ली ग्रामपंचायत येथे ६ ते १० मार्च या कालावधीत सकाळी १० ते ५ या वेळेत मार्गदर्शन दिले जाणार आहे. दोन तज्ञ पथक उपस्थित आपत्ती काळात कसे बचाव पथक करावे याबाबत प्रात्यक्षिक सह मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती मिलिं









