13 टक्क्यांनी वाढ : मागील आर्थिक वर्षात 18 लाख कोटी जीएसटी जमा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मार्च-2023 मध्ये जीएसटी संकलन 13 टक्क्यांनी वाढून 1.60 लाख कोटींहून अधिक झाले आहे. अर्थ मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून शनिवारी याबाबत माहिती दिली आहे. मार्च 2023 मध्ये एकूण जीएसटी महसूल संकलन 1,60,122 कोटी रुपये झाले आहे. जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतरचा हा दुसरा उच्चांक आहे. गेल्यावषी एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाने 1.68 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. तसेच या आर्थिक वर्षात मार्चमध्ये चौथ्यांदा जीएसटी संकलन 1.50 लाख कोटी ऊपयांच्या पुढे गेले आहे.
मार्च महिन्यातील एकंदर करसंकलनात सीजीएसटी 29,546 कोटी ऊपये, एसजीएसटी 37,314 कोटी ऊपये आणि आयजीएसटी अंतर्गत 82,907 कोटी ऊपये (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 42,503 कोटी ऊपयांसह) प्राप्त झाले आहेत. तसेच उपकर 10,355 कोटी ऊपये आहे. मार्च महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक आयजीएसटी संकलन झाले आहे.
मार्च 2023 चा जीएसटी महसूल मागच्या वषीच्या याच महिन्यातील महसुलापेक्षा 13 टक्के जास्त आहे. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल गेल्यावषीच्या तुलनेत 8 टक्के जास्त होता. देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल गेल्यावषीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 14 टक्के जास्त होता. मार्च 2023 मधील रिटर्न भरण्याचे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे.
राज्यनिहाय जीएसटी संकलनाचा विचार करता महाराष्ट्रातून सर्वाधिक 22,695 कोटी ऊपये इतके संकलन झाले आहे. तर कर्नाटकातून 10,360 कोटी इतके संकलन झाल्याचे सांगण्यात आले. देशात आकारमानाने सर्वात मोठे राज्य म्हणून ओळख असलेल्या उत्तर प्रदेशमधून मार्च महिन्यात केवळ 7,613 कोटी ऊपये जीएसटी जमा झाला आहे. तर, गुजरातमधून 9,919 कोटी ऊपये इतका जीएसटी प्राप्त झाला.
2022-23 मध्ये 18.10 लाख कोटी
संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 चा विचार करता एप्रिल 2022 ते मार्च 2023 या बारा महिन्यांमध्ये एकूण 18.10 लाख कोटी रुपयांचे वस्तू आणि सेवा कर संकलन झाले आहे. या आधारे मासिक जीएसटी संकलनाचा आकडा सरासरी 1.51 लाख कोटी ऊपये इतका झाला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात जीएसटीचा एकूण महसूल मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 22 टक्के अधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षात सकल जीएसटी संकलनाने 1.50 लाख कोटी ऊपयांच्या महसूल संकलनाचा आकडा चारवेळा ओलांडला आहे. एवढेच नाही तर मार्च 2023 मध्येच सर्वाधिक आयजीएसटी कलेक्शन दिसून आले आहे.









