नवी दिल्ली
मार्च 2022 पर्यंत भारत पेट्रोलियमचे (बीपीसीएल) खासगीकरण केले जाणार असल्याची माहिती मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमणियम यांनी दिली आहे. सध्याला एअर इंडियाच्या खासगीकरण प्रक्रियेला अंतिम स्वरुप दिले जात आहे. बीपीसीएलच्या खासगीकरणाची प्रक्रिया पुढील वषी मार्चपर्यंत पूर्णत्वाला येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.









