80 टक्के घरे उद्ध्वस्त : अन्न-औषधांपेक्षा वाहनांची मागणी अधिक शहराबाहेर पडण्याची धडपड
रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या शहरांची अवस्था बिकट होत चालली आहे. सर्वात भयावह स्थिती सीमावर्ती शहर मारियुपोलची आहे. येथे वीज, पाणी, धान्य आणि औषधांचा साठा संपुष्टात आला आहे. संपर्काचे कुठलेच साधन शिल्लक राहिलेले नाही. लोक उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्येच दिवस काढत आहेत, कारण 80 टक्क्यांहून अधिक घरे आणि इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे.
इच्छा असूनही लोकांना शहरातून बाहेर पडता येत नसल्याची स्थिती आहे. हल्ल्यांमुळे लोकांची वाहने नष्ट झाली आहेत. शहरात आता अन्न आणि औषधांपेक्षा वाहनांची गरज अधिक प्रमाणात जाणवत आहे. मारियुपोल शहराच्या महापौरांनुसार लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वाधिक मदतीची मागणी करण्यात आली होती.

शहराची लोकसंख्या निम्म्यावर
शहरातील आणि अन्य शहरांमधून आलेल्या वाहनांद्वारे एकाच दिवसात 20 हजारांहून अधिक लोक येथून बाहेर पडले आहेत. हल्ल्यापूर्वी येथे 4 लाख लोक राहत होते. आता ही संख्या 2 लाखांवर आली आहे. यातही 3 हजार नवजात तआहेत. मारियुपोलमधून बाहेर पडलेल्या लोकांनुसार पाणी शोधण्यास बाहेर पडतानाही भीती वाटावी अशी स्थिती आहे.
रशियाचे सैन्य एकाचवेळी अर्ध्या तासापर्यंत गोळीबार करते. हल्ल्यांमुळे मृतदेह दफन करणे देखील अवघड ठरले आहे. हल्ले थांबल्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे युक्रेनमधून परतलेली पत्रकार माजदा स्लामोवा यांनी म्हटले आहे.
मारियुपोलमध्ये लढत राहू

रशियाकडुन मारियुपोल शहरावर अंतिम कब्जासाठी देण्यात आलेली शरणागतीची मुदत संपुष्टात आली आहे. रशियाने रविवारी रात्री मारियुपोल प्रशासनाला शरणागतीसाठी मॉस्कोच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे 5 वाजेपर्यंतची (भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8 वाजता) मुदत दिली होती. शरणागती पत्करण्याचा प्रश्नच उद्वात नाही. कुठल्याही प्रकारे शरणागती आणि शस्त्र खाली ठेवण्यासारखी चर्चा होऊ शकत नसल्याचे पूर्वीच रशियाला स्पष्ट केले आहे. रशियाने 8 पानी पत्रावर वेळ घालविण्यासाठी मानवी कॉरिडॉर खुला करावा असे युक्रेनच्या उपपंतप्रधना इरिना वेरेस्चुक यांनी सुनावले आहे. मारियुपोलवर कब्जा झाल्यास रशियाला क्रीमियापर्यंत पोहोचण्यासाठी भूमार्ग मिळणार आहे. रशियाने 2014 मध्ये क्रीमिया गिळपृंत केले होते.









