‘हिसाब बराबर’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरू
बॉलिवूड अभिनेता आर. माधवन सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘हिसाब बराबर’च्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात अभिनेत्री कीर्ति कुल्हारी देखील मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या दिल्ली येथे केले जात आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण एनसीआर अन् गाजियाबादमध्येही पार पडणार असल्याचे समजते.

जुन्या दिल्लीतील चांदनी चौकात या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. आर. माधवन अन् कीर्ति कुल्हारी हे अभिनयसंपन्न कलाकार या चित्रपटात असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कीर्तिने स्वतःच्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळविले आहे. कीर्तिला या चित्रपटाच्या निमित्ताने आता माधवनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

माधवन यापूर्वी नम्बी या चित्रपटात दिसून आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यानेच केले होते. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. हा चित्रपट इस्रोच्या एका वैज्ञानिकावर आधारित होता. माधवन पुढील काळात आणखी एका बायोपिकमध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट ‘जी.डी. नायडू’ यांच्यावर आधारित असल्याचे समजते.









