प्रतिनिधी /पणजी
जोपर्यंत आम्हाला मातीबद्दलचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण मातीचा योग्य तऱहेने उपयोग करू शकणार नाही. जमिनीचा योग्य उपयोग व्हायचा असेल तर हे ज्ञान सगळय़ा शेतकऱयांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी केले.
जुने गोवे येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे साजरा करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड सॉईल डे‘ उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे या नात्याने श्री. नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. प्रविण कुमार व केंद्राचे प्रमुख, जे÷ वैज्ञानिक श्री. एच. आर. सी. प्रभू उपस्थित होते.
गोव्यातील 18 हजार हेक्टर खाजन शेतीची दुर्दशा झाली आहे. या जमिनीत आधी भात शेतीबरोबरच वेगवेगळय़ा प्रकारची लागवड होत होती. आज या जमिनीची दयनीय स्थिती झालेली आपण पाहतो आहोत. या जमिनीचे रक्षण करण्यासाठी आणि मातीची सुपीकता वाढविण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावी, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. प्रविण कुमार यांनी मातीचे रक्षण आणि सुपिकता वाढविण्यासाठी केंद्राच्या वतीने होत असलेल्या विविध उपायांसंदर्भात माहिती दिली. जागतिक स्थरावर प्रचंड प्रमाणात होत असलेल्या शेतीच्या नासाडीकडे लक्ष वेधताना डॉ. प्रविण कुमार म्हणाले, “दिवसें दिवस शेती कमी होत चाचली आहेत आणि खाणाऱयांची संख्या वाढत आहे. नापीक झालेली शेती पुन्हा सुपीक करणे शक्मय आहे. त्यासाठी मातीबद्दलचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. माती भूकेली आहे. तिची योग्य निगा राखणे आवश्यक आहे आणि यासाठी सॉईल हेल्थ कार्ड शेतकऱयांसाठी फार उपयुक्त ठरणार आहे,” असे ते म्हणाले.याप्रसंगी शंभर सॉईल हेल्थ कार्डचे प्रमुख पाहुणे श्रीपाद नाईक यांच्या हस्ते शेतकऱयांना वितरण करण्यात आले. कृषि विज्ञान केंद्रातर्फे श्री. नाईक यांचा यावेळी गौरव करण्यात आला. उद्घाटनाचा समारंभा आटोपल्यानंतर कृषी क्षेत्रातील नामवंतांची व्याख्यांने झाली. या व्याख्यांत्यामध्ये डॉ. गोपाल महाजन, श्री. शशी विश्वकर्मा, ब्रम्हकुमारी गोवा शाखेच्या बी.के. निर्मला दीदीजी यांचा समावेश होता. श्री. एच. आर. सी. प्रभू यांनी उपस्थितांचे स्वागत केले. श्री. राहुल कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.









