प्रतिनिधी/ बेळगाव
माजी महापौर संज्योत बांदेकर यांनी वृत्तपत्रामध्ये जाहीरात दिली म्हणून त्यांच्यावर आचारसंहिता भंग खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतिय न्यायालयात सुरू होती. त्या ठिकाणी माजी महापौर संज्योत बांदेकर यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे.
महानगरपालिकेच्या 2013 मध्ये निवडणूका झाल्या. त्यावेळी 48 तास आधी प्रचार बंद करणे बंधनकारक होते. मात्र त्यानंतरही एका वृत्तपत्रातून जाहीरात संज्योत बांदेकर यांनी दिली. त्यामुळे निवडणूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर कलम 127(ए) अन्वये गुन्हा नोंदविला. मात्र न्यायालयामध्ये ऍड. रतन मासेकर यांनी कलम 255(1) यानुसार हा आचारसंहिता भंग नसल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.









