प्रतिनिधी /पणजी
भाजपधून दोन वेळा आमदार माजी मंत्री महादेव नाईक यांनी आप पक्षात प्रवेश केला. दिल्ली येथे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे आणि पक्षाचे वरि÷ नेते सत्येंद्र जैन आणि अतिशी यांनी त्यांचे स्वागत केले.
महादेव नाईक हे लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे उद्योग, वस्त्र आणि कॉयर, समाज कल्याण, सहकार आणि हस्तकला ही खाती होती. 2009 ये 2012 या कालावधीत शिरोडा येथून दोन वेळा आमदारपदी निवडून आले होते.
कोरोनासारख्या संकटकाळात गोवेकरांसाठी केवळ आपने चांगले काम केले. अरविंद केजरीवाल यांनी 300 युनिट मोफत विजेसह 24/7 वीज देण्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या वचनामुळे प्रभावित होऊन आपण आपमध्ये प्रवेश केला, असे महादेव नाईक म्हणाले.
आपल्या आमदारकीच्या काळात मतदारसंघातील रुग्णालये, शाळा आणि रस्ते सुधारण्याचे काम केले. समाज कल्याण मंत्री म्हणून माझ्या कार्यकाळातील दोन वर्षात मी बहुजन समाजासाठी आरक्षण 19 टक्क्मयांवरून वरून 27 टक्क्मयांपर्यंत वाढवू शकलो, असेही महादेव नाईक यावेळी म्हणाले. गोव्यात आगामी सरकार आप पक्षाचेच असणार, असे ते म्हणाले.
सावंत सरकारला गोवेकर कंटाळलेले आहेत. जेव्हा त्यांनी मोफत विजेसारख्या मूलभूत मागण्या केल्या तेव्हा त्यांनी सरळ नकार दिला. केजरीवाल मॉडेलमुळे झालेला फरक पाहूनच महादेव नाईक आज आपमध्ये सामील झाले आहेत, असे आपचे राष्ट्रीय नेते सत्येंद्र जैन म्हणाले.
आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की “हे आता स्पष्ट होत चालले आहे की, आप हा गोव्यासाठी एकमेव पर्याय आहे.भाजपने निर्माण केलेल्या कठीण काळात फक्त आप त्यांच्या पाठीशी उभा आहे, राहुल म्हांबरे म्हणाले. भाजप आणि त्यांची बी टीम असणाऱया काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्धार आपने केला आहे.









