वृत्त संस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट क्षेत्रातील वयस्कर आणि अनुभवी क्रिकेट प्रशिक्षक तारक सिन्हा यांचे शनिवारी वयाच्या 71 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. तारक सिन्हा यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत भारताच्या अनेक क्रिकेटपटूंना मार्गदर्शन केले.
भारताचे माजी क्रिकेटपटू सुरिंदर खन्ना, मनोज प्रभाकर, अजय शर्मा, अतुल वासन, अशिष नेहरा, संजीव शर्मा, आकाश चोप्रा, शिखर धवन, अंजुम चोप्रा आणि ऋषभ पंत यांना सिन्हा यांच्याकडून बहुमोल मार्गदर्शन लाभले. गेल्या काही दिवसापासून तारक सिन्हा कर्करोगाशी लढत देत होते. शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे सिन्हा यांना आदरांजली वाहण्यात आली. सिन्हा यांनी आपल्या क्रिकेट प्रशिक्षक कारकीर्दीला येथील सॉनेट क्लबपासून सुरूवात केली होती.









