नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
प्रतिनिधी/ सातारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या योजना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सातारा शहरातील माजगावकर माळावरील झोपडपट्टीधारकांना हक्काचे चांगले घर देण्याकरता पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. प्रत्यक्ष योजनेच्या कामास प्रारंभ झाला असून लाभार्थ्यांना पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले आणि मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांनी त्यांच्या समस्येचे निराकारण केले आहे. तेथील झोपडपट्टी धारकांनी सहमती दिली असून आता त्यामुळे 300 घरकुलाचा मार्ग सुकर बनला आहे.
सातारा शहरात पालिकेच्या माध्यमातून अनेक योजना येत असतात. त्या योजना राबवत असताना प्रशासनाला अनेक पातळीवर तोंड द्यावे लागते. त्यातुन मार्ग काढत योजना पूर्णत्वाकडे नेल्या जातात. अशीच सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सातारा पालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबवण्यासाठी लाभार्थ्यांकडून प्रस्ताव आले. आलेल्या प्रस्तावानुसार प्रकल्प उभारण्याकरता जागा ठरली. माजगावकर माळावर 1958 घरे बांधण्याचा प्रकल्पाचे कामाची निविदा प्रक्रिया गेल्या तीन वर्षापूर्वी होवून त्या कामास सुरुवात झाली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात धिम्या गतीने काम सुरु होते. आता मात्र, या कामाने वेग घेतला आहे. आकाशवाणी झोपडपट्टीतील लाभार्थ्याना हक्काचे घर मिळणार आहे त्याबाबतची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, अभियंता दिलीप चिद्रे यांनी लाभार्थ्याना देवून त्यांच्या समस्येचे त्यांनी निराकरण केले. त्यांचे समाधान झाल्याने स्वतःहून पालिकेने ठरवून दिलेल्या जागेत आपल्या झोपडय़ा हलवल्या गेल्या आहेत. त्यामुळे 300 घरांचा मार्ग सुकर झाला आहे. लवकरच त्यांना चांगले घर मिळेल असे पालिकेतून सांगण्यात आले.
हक्काचे घर मिळणार अन्न वस्त्र निवारा या जगण्यासाठी मानवांच्या मूलभूत गरजा आहेत. तसेच परवा साताऱयात माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडली. एका 4 ते 5 वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचार झाला. त्या समाजाला राहायला घर नसल्यामुळे ते रस्त्यावर फुटपाथवर कोठेही राहतात, झोपतात. त्याचा गैर फायदा घेत एका नराधमाने आईच्या पुढय़ात झोपलेल्या मुलीला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केला जर का ते कुटुंब एका चार भिंतीच्या हक्काच्या घरात रहात असते तर हे प्रकरण घडले नसते. त्या लहान मुलीला त्या अत्याचारला सामोरे जावे लागले नसते. म्हणून जे लोक घराच्या निवाऱयापासून वंचित आहेत. अशा लोकांना हक्काचे घर देण्याचे काम प्रधान मंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सातारा नगरपालिका प्रशासनाने घरे बांधून देण्याचे काम हाती घेतलेले आहे. झोपडपट्टीतील नागरिक जे 30/35 वर्षांपासून बे घर होते. त्यांना आता हक्काची घरे मिळणार आहेत. म्हणून प्रथमतः मी नगरपालिका प्रशासन आणि मुख्यधिकारी अभिजित बापट यांचे आकाशवाणी झोपडपट्टीतील एक सुजाण नागरिक म्हणून मी व आमच्या येथील नागरिकांच्या वतीने आभार मानतो.









