यमुना ओलांडून श्रीकृष्ण आपल्या लव्याजम्यासह इंद्रप्रस्थाजवळ येऊन पोचला, ही वार्ता राजधानीत पसरली. युधि÷िरासह सर्व भावांना अतिशय आनंद झाला. त्याच्या स्वागतासाठी तो आपल्या सर्व लहान भावांसह लगेच निघाला. इंद्रप्रस्थाच्या बाहेर युधि÷िराचा परिवार आणि श्रीकृष्णाचा परिवार यांची भेट झाली. श्रीकृष्णाने रथातून उतरून युधि÷िराला नमस्कार केला. युधि÷िरानेही त्याला आलिंगन दिले. युधि÷िर, श्रीकृष्ण आणि इतर सर्व यागमंडपात आले. परस्परांचे क्षेमकुशल विचारले. त्यानंतर राजसूय यज्ञाला सुरुवात झाली. यजमान अर्थातच युधि÷िर होता. त्याने यथाविधी पूजा केली. वैभवपूर्ण असा यागविधी पार पडला. यागाच्या शेवटी सदस्यपूजा असा विधी असतो. ‘ही पूजा करण्यासाठी पात्र व्यक्ती कोणी आहे?’ असे युधि÷िराने भीष्म पितामहांना विचारले. तेव्हा उत्स्फूर्तपणे सहदेव म्हणाला, ‘श्रीकृष्ण तर देवाधिदेव आहे. ज्यांची ब्रह्मदेव, शंकरही नित्य पूजा करतात, अशा श्रीकृष्णालाच या अग्रपूजेचा मान मिळाला पाहिजे.’ उपस्थित सर्व विद्वज्जनांनीही त्याचे म्हणणे उचलून धरले. भीष्म पितामहांनीही सहदेवाची प्रशंसा करून त्याला अनुमोदन दिले. तेव्हा युधि÷िराने शास्त्राsक्त पद्धतीने श्रीकृष्णाच्या पूजेला सुरुवात केली. भीष्मांनी श्रीकृष्णाच्या प्रभावाचे, पराक्रमाचे आणि अवताराचे वर्णन केले. यथासांग पूजा पार पडली. सभेत केलेली श्रीकृष्णाची पूजा आणि पांडवांनी त्याचा केलेला बहुमान तिथे बसलेल्या चेदिराज शिशुपालाला सहन झाला नाही. कारण तो तर श्रीकृष्णाचा शत्रू होता. त्याने युधि÷िर आणि श्रीकृष्णाची निंदा करायला सुरुवात केली. शिशुपाल कृष्णाला अद्वातद्वा बोलत होता. शिव्याशाप देत होता. त्याचे हे उन्मत्तपणाचे बोलणे ऐकून अर्जुन आणि भीम इतर राजांसहित त्याला मारण्यासाठी अंगावर धावून जाण्यास उद्युक्त झाले. परंतु कृष्णाने त्यांना रोखले. पण कृष्णाचे भक्त असलेले सभाजन त्याची निंदा सहन न झाल्यामुळे तिथून उठून गेले. शिशुपालाने पितामह भीष्मांनाही त्यातून सोडले नाही. ‘हे भीष्म अनुभवाशिवाय केस पांढरे झालेले मूर्ख आहेत.’ अशीही त्याने निंदा केली.
वादविवाद सुरू झाला. तेव्हा भीष्मांनी पुन्हा कृष्णाची स्तुती सुरू केली. त्यामुळे शिशुपाल वेडापिसा झाला. तो सभा सोडून बाहेर निघून गेला. त्याचे समर्थक राजेही बाहेर गेले.
तेsमी मानुषराक्षसाः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये।
ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे।।
जे स्वार्थासाठी दुसऱयाचे हित नष्ट करतात, ते मनुष्यातील राक्षस होत. जे कोणत्याही प्रयोजनाशिवाय दुसऱयांचे हित नष्ट करतात, त्यांना काय म्हणावे, आम्ही जाणत नाही.
(क्रमशः)








