पुलाची शिरोली / प्रतिनिधी
“तू माझीच आहेस, तू माझीच राहणार , मी तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही ” असे म्हणणाऱ्या शिये ता. करवीर येथील मजनूच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिडित महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
शिये ता. करवीर येथील विठ्ठलनगर मधील विनोद शंकर काशीद व पीडित महिला हे दोघे विठ्ठलनगर येथे राहत असून विनोद काशीद हा या पिडित महिलेला वारंवार शिवीगाळ करून नाहक त्रास देत होता.
दिनांक २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पिडित महिला टोप हद्दीत असणाऱ्या एका खाजगी कंपनीत काम करते. त्या ठिकाणी जाऊन पिडित महिलेचा उजवा हात धरून “तू माझीच आहेस तू माझीच राहणार, मी तुला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही” असे म्हणत अश्लिल शिवीगाळ करत पीडितेस लज्जा उत्पन्न होईल. असे कृत्य विनोद काशीद याने केले. असा वारंवार त्रास देत असल्याने पीडित महिलेने घरच्या लोकांशी चर्चा करून आज समक्ष शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेश खांडवे हे करीत आहेत.