देशाच्या रक्षणाची घेतली शपथ
युक्रेनचे अध्यक्ष जेलेंस्की यांनी देशाच्या नागरिकांना शस्त्र घेण्याच आणि स्वतःच्या भूमीचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनच्या रक्षणासाठी आता नागरिकांपासून खासदारांनीही शस्त्र उचलले आहे. युक्रेनच्या खासदार कीरा रुडिक यांनी शनिवारी स्वतःचे एक छायाचित्र ट्विटरवर प्रसारित केले आहे. यात त्यांनी बंदूक हातात घेतल्याचे दिसून येते.
36 वर्षीय महिला खासदार सध्या वॉइस पार्टीच्या सदस्या आहे आणि 2019 पासून खासदार आहे. आपण युक्रेनची राजधानी कीव्ह येथे होते. आम्हाला कलाश्निकोव्ह रायफल देण्यात आली आहे. रशियाचे सैन्य कीव्हमध्ये आल्यास आम्ही त्यांच्याशी संघर्ष करू. मी राहत असलेल्या ठिकाणी आता गोळीबार सुरू झाला आहे. युक्रेनमध्ये थांबून राहणे हे माझे कर्तव्य आहे. मी आणि माझ्या सहकाऱयांनी शस्त्र हाती घेतल्याचे कीरा यांनी सांगितले आहे.
अमेझॉन कंपनीच्या सीओओ
कीरा या रिंग कंपनीच्या सीओओ होत्या. रिंग एक स्मार्ट सिक्युरिटी कंपनी असून 2018 मध्ये अमेझॉनने ती विकत घेतली होती. 2016-19 पर्यंत कीरा या सीओओ पदावर कार्यरत होत्या. कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी आणि आयटीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या कीरा यांनी आता रायफल हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. पुरुषांप्रमाणेच आम्ही महिला देखील आमच्या भूमीचे रक्षण करणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.









