मुंबई \ ऑनलाईन टीम
महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मतभेद असू शकतात. मात्र त्याचा अर्थ नाराजी आहे असा होत नाही. दोन वर्षांत तिन्ही पक्षांनी सरकार चालवताना उत्तम काम केलं आहे. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांच्या अस्वस्थतेमुळे महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरुन दिसतं असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, संजयजींच्या अस्वस्थेमुळे महाविकासआघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतयं. एकच कोडं कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना ‘मी हरामखोर नाही’हे का सिद्ध करावं लागतंय? …संजयजी माझं आवाहन की, तुम्ही ६ आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं. सोबत त्यांनी संजय राऊत यांचा फोटो देखील शेअर केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. मतभेद असू शकतात. मात्र त्याचा अर्थ नाराजी आहे असा होत नाही. दोन वर्षांत तिन्ही पक्षांनी सरकार चालवताना उत्तम काम केलं आहे. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.