प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड विलगीकरण केंद्राच्या सुरुवातीला बेळगावसह तालुक्यात 21,000 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी हिंडलगा हुतात्मा स्मारक येथे वृक्षारोपण करून संकल्पाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी शुभम शेळके यांनी सर्व गावोगावी सर्वांनी पुढाकार घेऊन या उपक्रमात सहभागी व्हावे आणि मागील काही वर्षांत भरमसाठ वृक्षतोड झाली आहे ती पोकळी भरून काढत पुन्हा एकदा बेळगावला गरिबांचे महाबळेश्वर बनविण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.यावेळी महादेव पाटील, मदन बामणे, अनिल हेगडे, बाळू जोशी, सुरज कुडूचकर, श्रीकांत कदम, सागर पाटील, मनोहर हुंदरे, नारायण मुचंडीकर, अश्वजित चौधरी, विनायक कावळे, आशीर्वाद सावंत, विक्रांत लाड आदी उपस्थित होते.









