ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात रविवारी 2436 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 52 हजार 667 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1695 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 1186 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 15 हजार 786 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 35 हजार 178 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 60 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबईत 38, पुणे 11, नवी मुंबई 3, ठाणे 2, औरंगाबाद 2, सोलापूर , कल्याण-डोंबवली आणि रत्नागिरीत प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये 42 पुरुष आणि 18 महिला रुग्ण आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 3 लाख 78 हजार 555 नमुन्यांपैकी 3 लाख 25 हजार 888 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 52 हजार 667 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 30 हजार 247 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 479 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.









