ऑनलाईन टीम / मुंबई :
पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराने राज्यात थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. आज सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 1780 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 120 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली.