ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्र राज्यात गुरुवारी दिवसभरात 778 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 427 झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण मुंबई, पुणे शहरात सर्वाधिक आहे.
राज्यात गुरुवारी 14 मृत्यांची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा 283 वर पोहचला आहे. तर आत्तापर्यंत 840 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
गुरुवारी एकट्या मुंबईमध्ये 487 नवे रुग्ण आढळल्याने मुंबईतील एकूण संख्या 4 हजार 205 वर पोहचली आहे. तर गुरुवारी मुंबईमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 167 झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात आत्तापर्यंत 96 हजार 369 यांच्या चाचण्या करण्यात आले असून त्यापैकी 89 हजार 561 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
तसेच सध्या महाराष्ट्रात एकूण 1 लाख 14 हजार 398 लोक होम क्वारंटाईन असून 8 हजार 702 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.









