ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, कन्टोनमेंट झोन बाहेरील वॉटर स्पोर्टस्, पार्क आणि पर्यटन स्थळी इन डोअर मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.
याबाबत सरकारच्या महसूल आणि वन आणि व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे.
- यामध्ये त्यांनी सांगितले की :
- कन्टोनमेंट बाहेरील पर्यटन स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
- कन्टोनमेंट बाहेरील जलक्रीडा, यान नौकानयन आणि अन्य खेळांना परवानगी देण्यात आली.
- कन्टोनमेंट बाहेरील पार्क, इनडोअर मनोरंजन कार्यक्रमांना देखील परवानगी देण्यात आली आहे.
यासोबतच सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.