ऑनलाईन टीम / मुंबई :
नागरिकत्व सुधरित कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद मागे घेण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागेची घोषणा केली.
ते म्हणाले, वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे. जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी महाराष्ट्र बंद मागे घेत आहोत. बंदसाठी आम्ही कोणावरही जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नाही असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
दरम्यान, बहुजनच्या या बंदला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईमध्ये मात्र, काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागलं. कुर्ला रेल्वे स्थानकावरुन चेंबूरकडे जाणाऱया 362 क्रमांकाच्या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली.









