न्यूयॉर्क
कोरोना महामारीच्या दरम्यानचा आपला ताजा इनोव्हेशन निर्देशांक-2021 ब्लूमबर्गने सादर केला आहे. या अहवालामध्ये भारताची स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत असल्याची नेंद केली आहे. जगातील इनोव्हेशन म्हणजे नवीन शोधासंदर्भातील कार्याबद्दलची दखल ब्लूमबर्गच्या अहवालात घेतली जाते. या यादीमध्ये भारताने 50 वे स्थान प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत भारताने वरचे स्थान प्राप्त केले आहे. पहिल्यापेक्षा अधिकची सुधारणा दिसून आल्याची माहिती आहे. सदरच्या निर्देशांकांमध्ये दक्षिण कोरिया सर्वोच्च स्थानी आहे. विशेष बाब म्हणजे अमेरिका ही पहिल्या दहा देशांच्या यादीमधून बाहेर पडली आहे. चीन एका स्थानाने घसरुन 16 व्या स्थानी आला आहे. जगभरात कोरोना महामारीच्या संसर्गानंतर प्रथमच ब्लूमबर्गने पहिलाच आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालामध्ये कोरोनाचा राहिलेला प्रभाव स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. 2021 च्या ब्लूमबर्ग इनोव्हेशन निर्देशांकात प्रामुख्याने जर्मनीला मागे टाकत दक्षिण कोरिया सर्वोच्च स्थानी राहिली आहे.









