उचगाव : लोकशाहीचे संवर्धन करण्यात मतदारांचे मतदान राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत असते. लोकशाहीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मळेकरणी हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी केले. अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ उचगाव संचलित मळेकरणी हायस्कूलमध्ये मतदार जागृती दिवस साजरा करण्यात आला. यावेळी एन. ओ. चौगुले बोलत होते. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मतदारांच्या कर्तव्यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर सर्वांना मतदारांची कर्तव्ये पार पाडण्यासंबंधी शपथ घेतली. मतदानाचे पावित्र्य प्रत्येक भारतीयाने सांभाळले पाहिजे. देशाचा विकास आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होत असतो. तेव्हा चांगले प्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे, असे इतर शिक्षक वर्गाने सांगितले. यावेळी व्ही. एम. देसाई, उमेश उचगावकर, प्रवीणा देसाई, प्रतीक्षा भाट, शितल कंग्राळकर, जी. के. तुप्पट, एस. एच. चौगुले उपस्थित होते.
Previous Articleकणकुंबी प्राथ. आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीचे उद्घाटन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.