सोमवारपासून वाहतूक पूर्ववत सार्वजनिक बांधकाम खात्याची माहिती
ओटवणे / प्रतिनिधी:
मळगांव घाटीतील कोसळलेल्या ब्रिटीशकालीन मोरीचे बांधकाम प्रगतीपथावर असून या मोरीच्या एका बाजूच्या पायाचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारपासून या मोरीच्या पायाचे काम पूर्ण झालेल्या बाजूवर पाईप बसविण्यात येणार असून येत्या तीन दिवसांत या मोरीचे काम पूर्ण करून सोमवारपासून या घाट रस्त्यातील वाहतूक पूर्ववत सुरू होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याने स्पष्ट केले आहे.
या मोरीची उंची साडे दहा मीटर असून लांबी १२ मीटर आहे. या मोरीला १२०० मिलिमीटरचे एम् पी ३ टाईपचे दोन पाईपच्या दोन लाईन बसविण्यात येणार आहे. गेले दोन दिवस पावसाचे प्रमाण वाढल्याने मोरीच्या कामात व्यत्यय येत आहे. सध्या या मोरीच्या दरी कडील महत्वाच्या पायाचे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारपासून या मोरीच्या दुसऱ्या बाजूचे खोदकाम करण्यात येणार असल्याचे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल आवटी, शाखा अभियंता सुरेश पाटील यानी सांगितले.









