प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा समाजाच्या विकासासाठी कर्नाटक राज्य सरकारने 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मराठा समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मराठा समाज विकास प्राधिकरण निर्माण करणार असल्याचे जाहीर केले आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेळगावमधील मराठा समाजाच्यावतीने सोमवार दि. 16 रोजी सकाळी 11 वा. धर्मवीर संभाजी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









