प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा मंदिराच्यावतीने मराठा बँक व जिजामाता बँकेच्या संचालक मंडळाचा नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष शिवाजीराव हंगीरकर यांनी लक्ष्मणराव होनगेकर यांचा सत्कार केला. तर चंद्रकांत गुंडकल यांनी बाळासाहेब काकतकर यांचा सत्कार केला. तसेच अश्विनीताई बिडीकर यांनी गायत्री काकतकर यांचा सत्कार केला.
यावेळी बोलताना नेताजी जाधव म्हणाले, सहकार क्षेत्रात या दोन्ही बँकांनी विश्वास संपादन केला आहे. यामुळे बँकेने सहकार क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. शिवाजीराव हंगीरकर यांनी नूतन संचालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लक्ष्मणराव सैनुचे, दिनकर घोरपडे, वसंत ढोबळे व इतर संचालक हजर होते.









