मुंबई/प्रतिनिधी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा आणि सोबतच बक्षिसांचा वर्षाव होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीरज चोप्राला फोन करून त्याचे अभिनंद केले आहे. नीरज चोप्रा मायदेशी कधी परतणार याची आस सर्वांना लागली आहे. नीरज चोप्राच्या हरियाणातील गावातही सध्या उत्साहाचं वातावरण असून दिवाळी साजरी केली जात आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीरज चोप्राच्या कुटुंबाशी फोन करून संवाद साधला असून सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कुटुंबाने एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी कुटुंबाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी “मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो” असं यावेळी ते म्हणाले आहे.
दरम्यान, हरियाणातील खांदरा हे नीरज चोप्राचं मूळ गाव आहे. पानिपत पासून एकही अंतरावर हे गाव आहे. उद्धव ठाकरेंनी पीएमार्फत नीरज चोप्राच्या कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अभिनंदन करत नीरज चोप्राचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी त्याची वेळ मागितली असून विधानसभेत बोलावून सन्मानित केलं जाणार आहे. मुंबईत त्याचं भव्य स्वागत होणार आहे अशी माहिती कुटुंबातील सदस्याने दिली. दरम्यान यावेळी त्यांनी “मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो” असंही उद्धव ठाकरे म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं.