सुदिन ढवळीकर यांनी केला विश्वास व्यक्त : प्रवीण झांटय़? यांचा मगोत प्रवेश. येणाऱया दिवसांत भाजपचे आणखीन आमदार फुटणार. मयेत रिंगणात उतरण्यास इच्छुक “ती ” कोण ?
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुका हा एकेकाळचा मगोचा बालेकिल्ला होता. मध्यंतरी या भागात पक्षाच्या कामात खंड पडल्याने या तालुक्मयात मगो पक्ष मागे राहिला. मात्र या निवडणुकीत मगो पक्षाला डिचोली व मये मतदारसंघात चांगले वातावरण निर्माण झाले असून येणाऱया निवडणुकीत डिचोली व मये मतदारसंघात मगो पक्ष जिंकणार आणि पुन्हा डिचोली तालुका मगोमय बनणार. असा विश्वास मगोचज सर्वेसर्वा आमदार सुदिन ढवळीकर यांनी डिचोली येथे व्यक्त केला.
मयेचे माजी आमदार प्रवीण झां?टय़? यांचा मगो पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम हिरा टॉकीज येथील कार्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ, कार्याध्यक्ष एड. नारायण सावंत, पक्षाचे खजिनदार अनंत नाईक, कार्यकारिणी सदस्य संदीप वेर्णेकर, पिळगावचे सरपंच संदीप सालेलकर, शिरगावचे सरपंच भगवंत गावकर, मयेचे माजी सरपंच सुभाष किनळकर, गोकुळदास सावंत व इतरांची उपस्थिती होती.
मगो पक्षात आज युवा पिढी आकर्षित होत असून मोठय़ा संख्येने युवा कार्यकर्ते या पक्षात येत आहे. मगो पक्षात आपण गेली 25 वर्षे आत्मयितेने काम केले असून येणाऱया काळात हा पक्ष युवा नेतृत्वाच्या हातात जाणार आहे. आज भाजपला मगोचे उमेदवार पळवावे लागत असून त्यांच्या पक्षातून जाणाऱया नेत्यांबध्दल आज भाजपवाले रोष व्यक्त करीत आहेत. प्रत्यक्षात आज राज्यात पक्षांतराची परंपरा रूजवलीच भाजपने. मगोचे, काँग्रेसचे आमदार रातोरात पळविले. परंतु आज वेळ त्यांची फिरली असून येणाऱया दिवसांत भाजपचे आमदार फुटणार असून पक्षांतर म्हणजे काय हे आज भाजपला समजणार. राज्याची या भाजपने प्रतिमा डागाळलेली असून केवळ लोकांची फसवणूकच केली आहे. आता गोव्यात मगोचीच आहे.
मयेत इच्छुक असलेली “ती” कोण ?
मये मतदारसंघात आमदार असताना प्रवीण झां?टय़? यांनी अनेक कामांचे प्रस्ताव सरकारदरबारी सादर केले होते. परंतु त्यांची कामे या मतदारसंघात अडविण्यत आली. हे आपणास माहित आहे. कारण या मतदारसंघात एक “ती” उमेदवार रिंगणात उतरण्यास इच्छुक होती. भाजपचाच आमदार असताना त्यांच्या फाईल्स अडवून ठेवणे कितपत योग्य. आणि या गोष्टीचे खापर झां?टय़? यांच्या माथ्यावर मारून ते काम करीत नसल्याचे सांगतात. हे सर्व उपद्व्याप “ती” उमेदवारासाठी असून “ती” ची खुप इच्छा रिंगणात उतरण्याची आहे.
डिचोली व मयेचा विकास मगोचे सरकार आल्यावर होणार
मये मतदारसंघात मगोची म्हणजेच प्रवीण झां?टय़? यांच्या विजयाची जबाबदारी हि कार्यकर्त्यांवर आली आहे. डिचोली व मये मतदारसंघात मगो पक्षाचे वातावरण निर्माण होऊन दोन्ही मतदारसंघात मगो पक्षाचा विजय होणे काळाची गरज आहे. कारण येणारे सरकार हे मगोचेच असणार. मगो पक्षाने आज जरी तृणमूल काँग्रेस पक्षाशी युती केली असली तरी मगो आपली तत्वे, ध्येय धोरणे कधीच सोडणार नाही. पक्षाचे विचार हे स्वतंत्र आहेत. डिचोली व मये मतदारसंघात एक लाख लोकसंख्या आहे. या लोकांसाठी सरकारी सुपरस्पेशलिटी इस्पितळाची गरज आहे. औद्योगिक वसाहत सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी येणाऱया काळात मगो पक्षालाच पाठिंबा देणे काळाची गरज आहे. असज यावेळी माजी आमदार नरेश सावळ यांनी म्हटले.
गोव्याच्या विकासासाठी मगोचीच राज्यात गरज
आज राज्यात खाणी सुरू करण्यास सरकार फोल ठरले. दहा हजार नोकऱया काढल्या परंतु हे सरकार त्या नोकऱयाही सरकार योग्यपणे देऊ शकले नाही. मये मतदारसंघातील बेरोजगार युवकांवर अन्याय झाला. औद्योगिक पातळीवर गोव्याची वाटचाल दिशाहीन झाली आहे. त्यासाठी आज गोव्यात मगो पक्षाचीच गरज आहे. डिचोली व मयेत मगोचा विजयी करताना राज्यात मगोचे पाय घट्ट करून येणाऱया सरकारात मगोचे स्थान बळकट करण्यासाठी झटावे लागणार. गेल्या पाच वर्षांत आपण कोणत्याही सूडबुद्धीने कार्य केलेले नाही. सर्वांना सहकार्य केले. असे यावेळी माजी आमदार प्रवीण झां?टय़? यांनी सांगितले. यावेळी एड. नारायण सावंत यांनी, एकेकाळी माजी आमदार तसेच लोकनेते स्व. अण्णा झां?टय़? हे मगो पक्षात होते. आणि त्यांनी पक्षाचे काम मोठय़ा आत्मयितेने केले होते. मात्र नंतर ते पक्षापासून दुरावले गेले. परंतु आज त्यांचे पूत्र प्रवीण झां?टय़? हे मगो पक्षात प्रवेश करीत असल्याने या कुटुंबाकडे मगोचे नाते अधिक घट्ट झालेले आहेत, असे म्हटले. आमदार सुदिन ढवळीकर यांनी प्रवीण झां?टय़? यांना मगो पक्षात प्रवेश दिला.









