वार्ताहर / काकती
येथील सिद्धेश्वर देवस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष, मार्केट यार्डातील प्रसिद्ध व्यापारी मनोहर बाळाराम मुंगारी (वय 68) यांचे सोमवार दि. 17 रोजी हृदयविकाराने निधन झाले. काकती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष तसेच अनेक सेवा संस्थांचे ते पदाधिकारी होते. म. ए. समितीचे कार्यकर्ते म्हणून त्यांचे कार्यही उल्लेखनिय होते.
काकती स्मशानभूमीत सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, तीन भाऊ, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. 20 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.









