प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका दक्षिण विभाग शहर अभियंत्यापदी कार्यरत असलेल्या लक्ष्मी निप्पाणीकर यांना बढती मिळाली आहे. महापालिका अधिक्षक आभियंत्यापदी त्यांची नियुक्ती झाली आहे. मात्र आता दक्षिण शहर अभियंते पद रिक्त झाले आहे.
महापालिका कार्यालयात बढती आणि बदलीचा कायदा लागू करण्यात आल्याने या प्रक्रियेला वेग आला आहे. महापालिका कार्यालयातील रिक्त असलेल्या पदावर राज्यातील विविध आधिकाऱयांना बढती देण्यात आली होती. बढती व बदली कायदा लागू झाल्यानंतर अधिक्षक अभियतांपदी मन्मतय्या स्वामी यांची नियुक्ती झाली होती. पण त्यांची बदली झाल्यानंतर अधिक्षक अभियंतापदाची जबाबदारी आर.एस.नायक तसेच लक्ष्मी निपाणीकर यांच्याकडे प्रभारी कार्यभार होता. पण अलिकडेच सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंते बेळेगेरी रंगास्वामी यांची नियुक्ती अधिक्षक अभियंता म्हणून महापालिकेत झाली होती. पण महापालिका कार्यलयात दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंत्या म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मी निप्पाणीकर यांना बढती मिळाली असून त्यांची अधिक्षक अभियंतापदी नियुक्ती झाली आहे. यामुळे यापुढे अधिक्षक अभियंतापदाची जबाबदारी लक्ष्मी निपाणीकर यांची कायमस्वरूपी सोपविण्यात आली आहे.









