सांगली / प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे केलेल्या तक्रारी अनुसरून महापालिका नगर रचना विभाग अभियंता परमेश्वर हलकुडे यांनी सांगलीतील पारिजात कॉलनी येथे रस्ते कामाची पाहणी केली व याबाबत तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
फेडरेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद साबळे यांनी याबाबतचे निवेदन दिले होते . पारिजात कॉलनी याठिकाणी महापालिकेने रोड मंजूर केलेला आहे. तरीही काही कारणाने तो रोड केला गेला नाही. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांना जाण्यासाठी महापालिकेने रोड मंजूर केला होता. त्यांचे टेंडर सुद्धा मंजूर केले आहे . आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून रोड करण्यात यावा व त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली सदर मागणीचा लवकर विचार करण्यात यावा जर त्यांना न्याय मिळत नसेल तर संघटनेतर्फे सर्व स्वरूपात आंदोलन करण्यात येईल यावेळी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष समाधान लोंढे व सुधीर आवळे सांगली जिल्हा अध्यक्ष राजन चव्हाण उपाध्यक्ष गजानन कांबळे अमर मगदूम व आदी पदाधिकारी उपस्थित होते








