वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांचा इशारा : रास्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन
प्रतिनिधी /पर्वरी
राज्यातील किनारपट्टी भागातील वाहतूक खात्याचे अधिकारी रात्रीच्या वेळही दारू पिऊन वाहन चलविणाऱयावर कडक कारवाई करणार आहेत.तसे आदेश त्यांना लवकरच देण्यात येणार आहे.रास्ता सुरक्षेतेबाबत वाहतूक खात्यातील अधिकाऱयानी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. असे उद्गार वाहतूक मंत्री मविंन गुदिन्हो यांनी काढले.
पर्वरी येथे अकराव्या राज्य रास्ता सुरक्षा सप्ताह 2022 या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे,’गोवाकेन’चे रॉलंड मार्टिन व अन्य उपस्थित होते.
खड्डेमय रास्ता समस्यासंबंधी बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले,राज्यातील रास्ते सुव्यवस्थित स्थितीत ठेवण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची असून त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आमचे खाते समर्थ आहे. तसेच काही खात्यातील अधिकारी रास्ता सुरक्षता हा विषय गांभीर्याने घेत नाही. ते संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकानाही उपस्थित राहत नाहीत.त्यानी हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे.
यापुढे वाहतूक खात्यातील अधिकारी रात्रीच्या वेळी मोक्मयाच्या ठिकाणी थांबणार आहेत तसेच पब अँड बार यांच्या बाहेर थांबणार आहे. जेणेकरून दारू पिऊन गाडी चलविण्यावर आळा बसेल.सर्व टेक्सी चालकानी अप् चा उपयोग करावा. सदया ‘गोवा माइल्स’ सुरळीत वाहतूक करत आहेत. त्यामुळे ओला ,उबेर या सारख्या अप् ना परवानगी देण्याचा प्रश्न येत नाही. असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
वाहन चालकाना शिस्त आणण्यासाठी यापुढे कडक धोरण स्वीकारले जाईल.जो वाहतूक नियमांचे मोडणार त्यांना दंड देणात येणार आहे. तसेच वाहतूक पोलीसाना टार्गेट दिले जाईल.रास्ता सुरक्षा बाबतीत कोणतीच हयगय केली जाणार नाही असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.









